त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महादेवाला समर्पित असलेले एक फार प्राचीन मंदिर आहे. 1755-1786 AD मध्ये श्री. नानासाहे पेशवांनी हे मंदिर बांधले आहे. मंदीराचे पूर्ण बांधकाम हे काळ्या दगडांचा वापर करून केले गेले आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे तीन देवतांचे प्रतीक आहे १) ब्रह्मा २) विष्णू ३) महेश म्हणून याला त्रिंबक असे नाव आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ असलेला कुशावर्त कुंड हा येथील सर्वात मो े आकर्षण आहे. कुशावर्त कुंड हे पवित्र गोदावरी नदीचे उगम स्थान आहे. असे म्हणतात कुशावर्ताचा पाण्यात अंघोळ केल्याने सर्व पाप धून निघतात आणि माणसाला मोक्ष प्राप्ती होते. रामायणाचा काळात रामाने त्यांचे वडील दशरथ यांचे श्राद्ध विधी त्र्यंबकेश्वर येथेच गोदावरीचा का ी केले होते.
त्र्यंबकेश्वर मंदिर थेट दर्शन सुविधा :
त्र्यंबकेश्वर ट्रस्ट ने आता भाविकांसा ी थेट दर्शन सुविधा सुरु केली आहे. जे भाविक मंदिरात थेट दर्शनासा ी येऊ शकत नाहीत त्यांच्यासा ी हि सोया केली आहे. त्र्यंबकेश्वर टेम्पल चा अधिकृत वेबसाइट वर तुम्ही घरबसल्या त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता.
त्र्यंबकेश्वर ताम्रपत्रधारी पंडित :
त्र्यंबकेश्वर मध्ये ताम्रपत्रधारी पंडित आहेत ज्यांचा कडे नानासाहेब पेशवा यांनी दिलेले ताम्रपत्रे आहे. ते त्र्यंबकेश्वर चे अस्सल आणि त्र्यंबक मध्ये राहणारे अनेक दिवसांचे रहिवासी आहे. फक्त ताम्रपत्रधारी पंडितच त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करू शकतात. जर तुम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये नवीन असाल आणि तुम्हाला तेथील पंडितांकडून पूजा करून घ्यायची असेल तर आदी खात्री करा कि ते ताम्रपत्रे धारक पंडित आहेत कि नाही. ताम्रपत्रधारी पंडित काळ सर्प दोष, नारायण नागबली, कुंभ विवाह, त्रिपिंडी श्राद्ध पूजा, रुद्राभिषेक पूजा, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप इत्यादी अनेक प्रकारचा पूजा करणाया तुम्हला मदत करतात.
१) नारायण नागबली पूजा :
नारायण नागबली पूजा हि त्रिंबकेश्वर मध्ये केली जाणार सर्वात महत्वाची पूजा आहे. हि पूजा फक्त त्रिंबकेश्वर येथील अहिल्या गोदावरी संगम आणि सती महास्मशान येथे केली जाते. हा तीन दिवसांचा विधी असतो आणि फक्त ताम्रपत्रधारी पंडितच करतात. आपल्या पूर्वजांचा आत्मना शान्ति मिळून देण्यासा ी, मरणावेळी त्यांचा अपूर्ण राहिलेल्या इच्छांची पूर्तता करण्यासा ी हा विधी केला जातो. नारायण नागबली पूजेला पितृ दोष निवारण पूजा असेही म्हंटले जाते.
2) काल सर्प दोष पूजा :
काल सर्प दोष हा अतिशय घातक दोषांपैकी एक आहे. राहू आणि केतू या दोन ग्रहांचा चुकीचा ग्रहस्थितींमुळे काल सर्प दोष माणसाचा कुंडलीत उदभवतो. काल सर्प दोष माणसाला त्यांचा सर्व याशांपासून दूर ेवतो. काल सर्प दोष ला सौख्य हिरावून घेणारा दोष म्हणून ओळखले जाते. काल सर्प दोष चे आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा प्रभाव कमी करण्यासा ी काल सर्प दोष शांती पूजा केली जाते. त्र्यंबकेश्वर मध्ये केली जाणारी काल सर्प दोष शांती पूजा हि खूप प्रभावशाली रते.
भारतात असलेले हे १२ ज्योतिर्लिंग मंदिर सर्व जगातील लोकांना आकर्षित करणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी आहेत. जग भरातून हजारो लाखोंचा संख्येत लोक या मंदिरांना भेट देण्यासा ी येतात. त्र्यंबकेश्वर मंदिर फक्त ज्योतिर्लिंग मंदिर म्हणूनच प्रसिद्ध नाही तर तेथे केल्या जाणाऱ्या पूजा, गोदावरी नदी, कुशावर्त कुंड, निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर , ब्रह्मागिरी पर्वत इत्यादी अनेक िकाणांसा ी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
Leave Comment